*गॉर्डन गोल्ड*


*लेझरचा शोध*


*जन्म - १७ जुलै १९२०*


 गॉर्डन गोल्ड (17 जुलै, 1920 - 16 सप्टेंबर 2005) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. जे लेझरच्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत. लेझर आणि संबंधित तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाबरोबर तीस वर्षांच्या लढासाठी गोल्डला चांगले ओळखले जाते.  त्यानंतर मिळालेल्या पेटंट्सची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी कोर्ट लढाईत लेसर उत्पादकांशी लढा दिला.



१९५७ च्या नोव्हेंबरमध्ये, गोल्डला हे समजले की फॅब्रिक-पेरोट इंटरफेरोमीटरच्या रूपात दोन आरसे वापरुन एखादा योग्य ऑप्टिकल रेझोनेटर बनवू शकतो.  

त्याने बनवलेल्या या डिव्हाइसच्या संभाव्य वापराची अपेक्षा केली गेली.


https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/ 


👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.


whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर *Request* टाइप करुन *(फक्त whatsapp किंवा Telegram वरच)* पाठवा.

 *गॉर्डन गोल्ड*


*लेझरचा शोध*


*जन्म - १७ जुलै १९२०*


 गॉर्डन गोल्ड (17 जुलै, 1920 - 16 सप्टेंबर 2005) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. जे लेझरच्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत. लेझर आणि संबंधित तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाबरोबर तीस वर्षांच्या लढासाठी गोल्डला चांगले ओळखले जाते.  त्यानंतर मिळालेल्या पेटंट्सची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी कोर्ट लढाईत लेसर उत्पादकांशी लढा दिला.



१९५७ च्या नोव्हेंबरमध्ये, गोल्डला हे समजले की फॅब्रिक-पेरोट इंटरफेरोमीटरच्या रूपात दोन आरसे वापरुन एखादा योग्य ऑप्टिकल रेझोनेटर बनवू शकतो.  

त्याने बनवलेल्या या डिव्हाइसच्या संभाव्य वापराची अपेक्षा केली गेली.




 *फ्रिट्स झेर्निके*


*डच भौतिकीविज्ञ*


*जन्मदिन - १६ जुलै १८८८*


सजीव पेशीच्या आंतर्रचना पाहता येतील अशा सूक्ष्मदर्शकाचा शोध लावल्याबद्दल १९५३ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले.


झेर्निके यांचा जन्म नेदरलॅंड्समधील अॅम्स्टरडॅम येथे झाला. त्यांचे वडील कार्ल फ्रेडरिक ऑगस्ट झेर्निके प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. ते गणित हा विषय शिकवीत असत. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांना विलक्षण रस होता. विविध वैज्ञानिक विषयांवरची प्राथमिक माहिती देणारी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांची आई अॅण्टजे डिएपेरिंक शाळेत गणित शिकवीत असत.


झेर्निके यांना वडिलांप्रमाणे मनापासून भौतिकशास्त्र आवडत असे. अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून त्यांनी प्रयोगासाठी लागणाऱ्या नळ्या व काचेची भांडी त्यांनी स्वत:च्या पैशातून जमविली होती. माध्यमिक शाळेत त्यांना विज्ञान विषयात भरपूर गुण मिळाले होते. परंतु इतिहास व भाषा या विषयांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. पुढे विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना ग्रीक व लॅटिन या भाषांचा अभ्यास करावा लागला. शाळेत असताना झेर्निके यांचा संपूर्ण वेळ प्रयोग करण्यात जात असे. याच काळात त्यांना रंगीत छायाचित्रणाची गोडी लागली. त्यासाठी लागणारी साधनसामुग्री विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळेच प्रयोगासाठी लागणारी साधने त्यांनी स्वत:च तयार केली. कॅमेरा तयार करण्याचे तंत्र समजून घेऊन त्यांनी प्रयोगासाठी योग्य असा कॅमेरा आणि अंतराळाचा वेध घेण्यासाठी प्रयोगशाळा तयार केली. यामुळेच ते धूमकेतूचेही छायाचित्रण करू शकले.


इ.स. १९०५ मध्ये झेर्निके यांनी अॅम्स्टरडॅम विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांचा प्रमुख विषय रसायनशास्त्र तर भौतिकशास्त्र व गणित हे दुय्यम विषय होते. १९१३ मध्ये त्यांनी या विद्यापीठाची बी. एस्. पदवी संपादन केली. लहानपणापासूनच गणित या विषयात प्रावीण्य असल्यामुळे १९०८ मध्ये ग्रोनिंगेन विद्यापिठात असतांना त्यांना गणित विषयाचे सुवर्ण पदक मिळाले; तर पदार्थाच्या वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शकतेवर (Critical Opalescence) केलेल्या सखोल अभ्यासाबद्दल १९१२ मध्ये त्यांना दुसरे सुवर्ण पदक मिळाले. परीक्षक मंडळावर त्या काळातील शास्त्रज्ञ हेंड्रिक आंटोन लोरेन्ट्स, व्हॅन डर व्हाल्स व हर्म्यान्स हागा हे होते. या बक्षिसपात्र निबंधाचा पाया धरून झेर्निके यांनी. प्रबंध लिहून, १९१५ मध्ये ग्रोनिंगेन विद्यापीठाची पीएच्.डी पदवी मिळविली.


इ.स. १९१३ मध्ये ग्रोनिंगेन विद्यापीठातील प्रख्यात प्राध्यापक केप्टेन (Prof. Kepteyn) यांनी झेर्निके यांना सहाय्यक म्हणून बोलावून घेतले. १९१५ मध्ये त्यांना प्रथमच अध्यापक म्हणून नोकरी मिळाली. ही नोकरी त्यांना रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्र शिकविण्यासाठी नव्हे, तर गणितीय भौतिकशास्त्र (Mathematical Physics) शिकविण्यासाठी मिळाली. १९२० मध्ये ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. १९५८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १९४८ मध्ये त्यांनी बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले.


संवेदनाशील गॅल्व्हानोमीटर बनविण्यासाठी झेर्निके यांनी केलेले प्रयोग १९२३ पासून सर्वश्रत होते. १९३० पासून त्यांनी प्रकाशलहरींवर आपले लक्ष केंद्रित केले. पारदर्शक पदार्थामधून प्रकाशकिरण गेल्यावर वक्रीभवनामुळे तयार होणाऱ्या सदोष प्रतिमेवर अभ्यास करून निर्दोष प्रतिमा मिळवून देणारे सूक्ष्मदर्शक यंत्र त्यांनी तयार केले. परंतु त्याचे महत्त्व त्यावेळी लक्षात आले नाही. त्यामुळे ते दुर्लक्षितच राहिले. जर्मनीच्या व्हरमॅट(Wehrmacht) यांना हे संशोधन दुसऱ्या महायुध्दात उपयोगी पडू शकते हे जाणवले आणि त्याचे महत्त्व एकदम वाढले. दुसरे महायुध्द संपल्यावर जर्मन कंपनीने हजारो सूक्ष्मदर्शक यंत्रे तयार केली. सजीव पेशींचा अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा जास्त उपयोग झाला. याच संशोधनाबद्दल १९५३ मध्ये झेर्निके यांना नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.


झेर्निके यांच्या संशोधनाची पावती रॉयल मॅक्रोस्कोपिक सोसायटीने रम्फर्ड पदक बहाल करून दिली (१९५२). त्याचप्रमाणे त्यांना अॅम्स्टरडॅम विद्यापिठातर्फे पीएच्.डी. पदवी सन्मानपूर्वक देण्यात आली.


झेर्निके यांचा मृत्यू ग्रोनिंगेन येथे झाला.



 *चंद्रकांत रामराव तळपदे*


*रसायनशास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारक*


*स्मृतिदिन - १५ जुलै २००४*


चंद्रकांत रामचंद्र तळपदे यांनी आपल्या ८९ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात शिक्षण मिळविण्यासाठी वेचलेली सुरुवातीची पंचवीस वर्षे वगळता उर्वरित आयुष्य वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञानप्रसार करण्यात व्यतीत केले. डॉ. तळपदे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतून डॉ. माताप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम.एस्सी., पी.एच.डी.पर्यंतचे शिक्षण, उच्च श्रेणी मिळवून पूर्ण केले. १९३८ ते १९४१ सालांदरम्यान एल्फिन्स्टन महाविद्यालयात अध्यापन केल्यावर दादाजी धाकजी कंपनीत सल्लागार म्हणून, सौराष्ट्रमधील खारगोडा, राजस्थानमधील सांबारलेक या ठिकाणी काम केले. १९४५ साली अफगाणिस्तानमध्ये सल्लागार म्हणून काम करण्याची संधी त्यांना शासनातर्फे मिळाली. वर्षभराने अफगाणिस्तानहून परत आल्यावर फर्गसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. वसतिगृहाचे रेक्टर, केमिस्ट्री असोसिएशन, आर्ट सोसायटी या संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे ते जातीने लक्ष पुरवीत असत. महाविद्यालयातील खेळांच्या सामन्यांच्यावेळी, विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी ते जातीने मैदानात हजर राहत असत.


डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील कीर्ती महाविद्यालयाच्या उभारणीत डॉ. तळपदे यांचा फार मोठा वाटा आहे. १९५४ ते १९७५ या कालावधीत ते कीर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. पंचवीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली, तर एका विद्यार्थ्याने पीएच.डी. मिळवली. त्यांचे पंचवीस संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.


विद्यार्थ्यांच्या सहवासात, अध्यापन करीत असताना, रसायनशास्त्राविषयी त्यांचे सतत मनन, चिंतन चालू राहिले. त्यामधूनच प्रेरणा मिळून त्यांनी विज्ञान साहित्याची मराठीत निर्मिती करून अणुशक्ती, मूलतत्त्वे असे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले.


‘अणुशक्ती’, ‘नोबेल पारितोषिकाचे मानकरी’ (रसायनशास्त्र भाग १ ते ५), ‘रसायनशास्त्राचे कारागीर’ (भाग १ ते ८) यांसारख्या त्यांच्या पुस्तकांनी मराठी विज्ञान साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांना दोन वेळा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला होता. डेक्कन व्हर्न्याक्यूलर ट्रान्सलेशन सोसायटीने पारितोषिक देऊन त्यांना गौरविले होते.


विज्ञानकथा हाही प्रकार त्यांनी हाताळला. त्यांच्या विज्ञानकथा ‘नवल’, ‘हंस’ या मासिकांतून प्रसिद्ध  झाल्या. मराठी विज्ञान परिषदेच्या ‘विज्ञान पत्रिके’तून ते सातत्याने लिहीत असत.


‘सौराष्ट्रातील पर्जन्यसूक्त’ हा त्यांचा शेवटचा लेख परिषदेने जून १९९८ च्या अंकात छापला होता. मराठी विज्ञान परिषदेच्या मंचावरून त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली. १९७५ साली हैद्राबाद येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला होता.

— गार्गी लागू



 *Robert F. Overmyer*


*NASA astronaut*


*Born - July 14, 1936*


Robert Franklyn "Bob" Overmyer (July 14, 1936 – March 22, 1996) (Col, USMC) was an American test pilot, naval aviator, aeronautical engineer, physicist, United States Marine Corps officer and USAF/NASA astronaut. Overmyer was selected by the Air Force as an astronaut for its Manned Orbiting Laboratory in 1966. Upon cancellation of this program in 1969, he became a NASA astronaut and served support crew duties for the Apollo program, Skylab program and Apollo-Soyuz Test Project. In 1976, he was assigned to the Space Shuttle program and flew as pilot on STS-5 in 1982 and as commander on STS-51-B in 1985. He was selected as a lead investigator into the Space Shuttle Challenger disaster and retired from NASA in 1986. Ten years later, Overmyer died in Duluth, Minnesota while testing the Cirrus VK-30 composite homebuilt aircraft.



 📒 *मूतखडा म्हणजे काय?* 📒

*******************************


मूत्रपिंड, मूत्रवाहिनी व मूत्राशय यांत होणाऱ्या खड्यांनी 'मूतखडा' असे म्हणतात. मूत्रपिंडाचे कार्य हे शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखणे हे असते. लघवीमध्ये पाणी, क्षार, थोड्या प्रमाणात पेशी असतात. लघवीत पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास तुलनेने त्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. हे क्षार मूत्रमार्गात एखाद्या ठिकाणी गोळा होतात व कालांतराने त्याचा खडा तयार होतो. मूत्रमार्गात जर काही रचनात्मक वैगुण्य असेल वा मूत्रमार्गाच्या आवरणात खडबडीतपणा निर्माण झाला असेल, तर खडे तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते.


जर पाण्यात असलेल्या जास्तीच्या क्षारांमुळे, पाणी कमी प्यायल्याने; अळू, पालक, टोमॅटो या भाज्यांच्या सेवनामुळे; तसेच मूत्रमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास कालांतराने मूतखडे तयार होतात. मात्र प्रत्येकवेळी कारण सांगता येईलच असे नाही. मूतखड्यामुळे पोटात खूप वेदना होणे (ही वेदना जांघेत व शिश्नापर्यंत जाते), लघवीत रक्त असणे, पोटात मंद दुखत राहणे; अशी लक्षणे दिसतात.


कधी कधी तापही येतो. मूतखड्यामुळे मूत्रपिंडावर दाब आला असेल, तर मूत्रपिंड कायमचे निकामी होऊ शकते. मूतखड्याची लक्षणे ही खडा कोठे आहे यावर अवलंबून असतात. क्ष-किरण तपासणीत (साधा क्ष-किरण फोटो वा शिरेतून विशिष्ट रंग शरीरात टोचून काढलेले मूत्रपिंडाचे फोटो ) मूतखड्याचे निदान होऊ शकते. खड्याचा प्रकार व जागा यावरून भरपूर पाणी पिऊन तो पाडायचा प्रयत्न करणे. शस्त्रक्रिया करून काढून टाकणे, ध्वनिलहरींचा वापर करून खडा फोडून मूत्रमार्गे त्याचे कण बाहेर टाकणे, आदी उपाय करता येतात.


मूतखडा होण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांनी भरपूर पाणी प्यावे. विशेषत: उन्हाळ्यात व प्रवासात जास्त काळजी प्यावी. जड पाणी (बोअरचे पाणी/ जास्त कॅल्शियम असलेले पाणी) पिऊ नये आळूसारख्या भाज्या कमी खाव्यात. दिवसाला निदान ४ ते ५ लिटर पाणी पिणे, हा सगळ्यात सोपा प्रतिबंधक उपाय आहे.



 *दिनकर धोंडो कर्वे*


*रसायनशास्त्रज्ञ*


*जन्मदिन - १३ जुलै १८९९*


दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ते बी. एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्रविषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी. फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.


शिक्षणक्षेत्रातच उत्तम कामगिरी करण्याचा ध्यास डॉ. कर्वे यांनी घेतला. फर्गसन महाविद्यालयामध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयामध्ये आवड निर्माण झाली. फर्गसन महाविद्यालयामधील त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांच्या कडक शिस्तप्रियतेचा अनुकूल परिणाम महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसून आला. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले.


त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियतकालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यायोगे विज्ञान प्रसारही केला. वीस वर्षे प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडून ते निवृत्त झाले. तथापि त्यांनी त्यानंतर सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.


डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी - अ‍ॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा. इरावती कर्वे यांनी लिहिला होता. त्याचे मराठीकरण डॉ.दिनकर कर्वे यांनी केले. ‘हिंदू समाज - एक अन्वयार्थ’ त्या ग्रंथाचे शीर्षक होते. त्याचे प्रकाशन असे ११ ऑगस्ट, १९७५ रोजी झाले होते. १९५९ साली त्यांचे ज्येष्ठ बंधू रघुनाथ कर्वे यांनी ‘संतती नियंत्रण: विचार व आचार’ हे पुस्तक लिहिलेले होते त्याची अभ्यासपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठित प्रस्तावना  डॉ.दिनकर कर्वे यांनी लिहिलेली होती.


१९६४ साली प्रकाशित झालेल्या ‘ए हिस्टरी ऑफ एज्युकेशन इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ या पुस्तकाचे डॉ.दिनकर कर्वे सहलेखक होते. त्यांनी ‘दि न्यू ब्राह्मण्स: फाइव्ह महाराष्ट्रीयन फॅमिलीज’ महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला होता. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वडलांसह तत्कालीन सामाजिक कार्याला झोकून देणाऱ्या पाच कुटुंबीयांच्या कार्याचा आढावा  घेतला होता.


१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अ‍ॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला. १९७८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे ते पुस्तक प्रकाशित झाले.


बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास  होता. त्याचा परिपाक म्हणून धार्मिक कर्मकांड; समाज ज्याला धर्म मानतो, त्याची सबंध चौकट, देवाच्या अस्तित्वावर विश्वास या सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या. ते कट्टर निरीश्वरवादी होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत.

-डाॅ. अनिल लचके



 📒 *काविळीमध्ये डोळे, लघवी पिवळी का दिसते?* 📒

***********************************


डोळे पिवळे झाले, लघवी पिवळी होऊ लागली, त्वचेला पिवळट रंग आला म्हणजे कावीळ झाली; हे सर्वांनाच माहीत आहे. कावीळ हा एक रोग असून तो विषाणू, जिवाणूंच्या संसर्गामुळे वा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे तसेच पित्ताशयाच्या वा पित्तनलिकेच्या काही रोगांमुळेही होऊ शकतो. अर्थात सर्वसामान्यपणे दूषित पाण्यातील विषाणूंच्या संसर्गामुळे बऱ्याच जणांना हा रोग होतो.


रक्तात लाल पेशी असतात. या पेशी १२० दिवसांपर्यंत जगतात. नंतर अस्थिमज्जा, यकृत प्लीहा व लिंफ ग्रंथीत जुन्या पेशींचा नाश केला जातो. यात लाल पेशीतील हिमोग्लाबीनचे रूपांतर हिम व ग्लोबीनमध्ये केले जाते. हिमचे रूपांतर बिलीरूबीन या द्रव्यात केले जाते. याचा रंग पिवळा असतो. डोळ्यांच्या पांढऱ्या भागाबाबत या पदार्थाला विशेष आकर्षण असल्याने प्रथमत: तेथे तो जमा होतो व डोळे पिवळे दिसतात. सामान्यपणे बरेचसे बिलीरूबीन पचनसंस्थेतून परत शोषुन घेतले जाते. यकृत खराब झाले तर मात्र रक्तातील बिलीरूबीनच्या प्रमाणात वाढ होते व हे पाण्यात विद्राव्य असलेले बिलीरूबीन लघवीतून उत्सर्जित केले जाते. साहजिकच लघवीचा रंग पिवळा दिसतो. यकृतावर परिणाम झाला, तरच लघवी पिवळी दिसते. लाल रक्तपेशींचा नायनाट होण्याचे प्रमाण काही कारणांमुळे वाढले, तर रक्तातील बिलीरूबीनचे प्रमाण वाढते; पण हे बिलीरूबीन पाण्यात विद्राव्य नसल्याने लघवीवाटे बाहेर टाकले जात नाही. आपण आधीच बघितले की, कावीळ अनेक कारणांनी होत असली तरी विषाणूंमुळे होणारी कावीळ सर्वात जास्त प्रमाणात आढळते. यात यकृताची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील जलविद्राव्य बिलीरूबीनचे प्रमाण वाढते. म्हणूनच काविळीत डोळे पिवळे दिसतात व लघवी पिवळी होते.



 *जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर*


*अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ*


*जन्मदिन - जुलै १२, १८६४*


जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्राविण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.







 

 📙 *डॉक्टरांच्या गाड्या, रुग्णालये यांवर रेडक्रॉसची खूण का असते ?* 📙

हेन्री डय़ूनाँट या स्विस व्यापार्‍याने १९५९ मध्ये उत्तर इटलीतून प्रवास करताना साॅलफेरीनोचे युद्ध पाहिले. जखमी सैनिकांच्या मदतीसाठी त्याने स्वयंसेवक गोळा केले व मदतकार्य केले. नंतर सर्व युरोपभर फिरून त्याने युद्धातील जखमींना मदत करण्यासाठी निष्पक्ष अशी स्वयंसेवी संघटना अस्तित्वात यावी यासाठी प्रचार केला. यांच्या प्रयत्नांमुळे १८६४ साली 'रेडक्रॉस' ही अराजकीय, अशासकीय अशी मानवतावादी आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आली. सुरुवातीला युद्धातील जखमी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना मदत करणारी ही संघटना गेली काही दशकात नैसर्गिक आपत्ती, आरोग्य समस्या, रक्तदान अशा अनेक प्रकारच्या मदतकार्यात सहभागी होत आहे.

'लाल फुली' हे या संघटनेचे चिन्ह होय. रेडक्रॉसचे स्वयंसेवक, त्यांच्या गाड्या खूप याव्यात हा या चिन्हाचा उद्देश होता. त्यामुळे हे चिन्ह बाकी कोणी वापरत नसे. कालांतराने सैन्यदलांचे डॉक्टर व त्यांची वाहने इत्यादींसाठी हे चिन्ह वापरले जाऊ लागले. सध्या सर्व डॉक्टर्स त्यांच्या गाड्या व रुग्णालये यावर हे चिन्ह सर्रास वापरले जाताना दिसते. त्यामुळे असा वापर रूढ झाला आहे. एका विशिष्ट संघटनेचे चिन्ह असलेली ही 'लाल फुली' समाजात एवढी रुढ झाली की 'लाल फुली, म्हणजे 'वैद्यकीय सेवेची उपलब्धता' असा त्याचा अर्थ आपोआप ध्वनित होतो. त्यामुळेच डॉक्टरांच्या गाड्या, रुग्णालये इत्यादींवर रेड क्रॉसची खूण असे.

 रेडक्रॉसचे हे चिन्ह डॉक्टर व रुग्णालये यांनी वापरू नये असे सांगितले आहे. त्यामुळे आता अनेक डॉक्टर व रुग्णालयांवर लाल फुलीचा चिन्ह आढळून येत नाही त्या ऐवजी नवीन चिन्ह पहायला मिळते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन



 *Christopher Latham Sholes*


*"The Father of the typewriter"*


*Born - February 14, 1819*

Christopher Latham Sholes[2] (February 14, 1819 – February 17, 1890) was an American inventor who invented the first practical typewriter and the QWERTY keyboard still in use today.[3] He was also a newspaper publisher and Wisconsin politician.

Although many modern typewriters have one of several similar designs, their invention was incremental, provided by numerous inventors working independently or in competition with each other over a series of decades. As with the automobile, telephone, and telegraph, a number of people contributed insights and inventions that eventually resulted in ever more commercially successful instruments. In fact, historians have estimated that some form of typewriter was invented 52 times as thinkers tried to come up with a workable design.






 *Donald E. Williams*


*NASA astronaut*


*Born - February 13, 1942*


Captain Donald Edward Williams (February 13, 1942 – February 23, 2016) was an American naval officer and aviator, test pilot, mechanical engineer and NASA astronaut. He logged a total of 287 hours and 35 minutes in space.


Selected by NASA in January 1978, Williams became an astronaut in August 1979, qualified for assignment as a pilot on future Space Shuttle flight crews. He then had various support assignments, including working at the Shuttle Avionics Integration Laboratory (SAIL) as a test pilot, and at the Kennedy Space Center participating in orbiter test, checkout, launch and landing operations.


From September 1982 through July 1983, he was assigned as the Deputy Manager, Operations Integration, National Space Transportation System Program Office at the Johnson Space Center. From July 1985 through August 1986, Williams was the Deputy Chief of the Aircraft Operations Division at the Johnson Space Center, and from September 1986 through December 1988, he served as Chief of the Mission Support Branch within the Astronaut Office.


Williams served as pilot on STS-51-D in 1985, and was the spacecraft commander on STS-34 in 1989.



 *चार्ल्स डार्विन*


*उत्क्रांतिवादाचा जनक*


*जन्म - १२ फेब्रुवारी, १८०९*


चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.

इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.

१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.




 *थॉमस अल्वा एडिसन*


*प्रसिद्ध शास्त्रज्ञ*


*जन्मदिन - ११ फेब्रुवारी, इ.स. १८४७*


थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.

जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.

फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.

एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.

१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.

एकाधिकार

इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या मतनोंदणी मशीनसाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) ९०,६४६

विद्युत दिव्यासाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) २,२३,८९८ (४ नोव्हेंबर, इ.स. १८७९ ला मागणी केली व २७ जानेवारी, इ.स. १८८० रोजी एकाधिकार मिळाला.)




 *९ फेब्रुवारी १९८६*


*हँलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.*


*🔘हॅले धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. ९ फेब्रुवारी इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे

*🌠धूमकेतूचे आकारमान*

*🔘धूमकेतूच्या शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० कि.मी. असून त्याचे वस्तुमा


न १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.

*🌌धूमकेतूची शेपटी*

*🔘धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्‍या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते



 *जॉन डीयर*


*डीयर अँड कंपनीचे संस्थापक*


 *जन्म: ७ फेब्रुवारी १८०४*


जॉन डीयर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८०४ रोजी झाला. ते अमेरिकन लोहार आणि निर्माते होते. जगातील सर्वात मोठ्या आणि अग्रगण्य शेती आणि बांधकाम उपकरणे निर्माण करत असलेल्या डीयर अँड कंपनीचे ते संस्थापक आहेत. १८३७ मध्ये त्यांनी पहिल्या स्टील नांगराचा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी शोध लावला.





 *०६ फेब्रुवारी १९५९*


*जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला*


सन् १९४७ में ट्रांजिस्टर के आविष्कार के बाद एकीपरि (एकीकृत परिपथ) के विकास का रास्ता साफ हो गया था। सन् १९५८-५९ में दो व्यक्तियों ने लगभग एक ही तरह की आई सी लगभग एक ही समय विकसित की। वे अलग-अलग काम कर रहे थे और एक-दूसरे के काम से अनभिज्ञ थे। ये व्यक्ति थे - टेक्सास इंस्ट्रूमेन्ट्स में कार्यरत जॅक किल्बी (Jack Kilby) और फेयरचाइल्ड सेमीकंडक्टर कारपोरेशन के सह-संस्थापक रॉबर्ट नॉयस (Robert Noyce)। 


दोनो ही विद्युत इंजीनियर थे और दोनो ही इस बात का हल निकालने में जुटे थे कि अनेकानेक संख्याओं वाले परिपथों को कैसे विश्वसनीय रूप से निर्मित किया जाय और उनका आकार कैसे छोटा किया जाय। आज हम कह सकते हैं कि यदि ट्रांसिस्टर का आविष्कार न होता तो एकीपरि न होता; और एकीपरि न होता तो कम्प्यूटर और अन्य एलेक्ट्रॉनिक उपकरण न होते जिनका परिपथ करोड़ों-


अरबों अवयवों से बना होता है।


एलेक्ट्रॉनिकी में एकीकृत परिपथ या एकीपरि (इन्टीग्रेटेड सर्किट - IC) को सूक्ष्मपरिपथ (माइक्रोसर्किट), सूक्ष्मचिप, सिलिकॉन चिप, या केवल चिप के नाम से भी जाना जाता है। यह एक अर्धचालक पदार्थ के अन्दर बना हुआ एलेक्ट्रॉनिक परिपथ ही होता है जिसमें प्रतिरोध, संधारित्र आदि पैसिव कम्पोनेन्ट (निष्क्रिय घटक) के अलावा डायोड, ट्रान्जिस्टर आदि अर्धचालक अवयव निर्मित किये जाते हैं। 


जिस प्रकार सामान्य परिपथ का निर्माण अलग-अलग (डिस्क्रीट) अवयव जोड़कर किया जाता है, आईसी का निर्माण वैसे न करके एक अर्धचालक के भीतर सभी अवयव एक साथ ही एक विशिष्ट प्रक्रिया का पालन करते हुए निर्मित कर दिये जाते हैं। 


एकीकृत परिपथ आजकल जीवन के हर क्षेत्र में उपयोग में लाये जा रहे हैं। इनके कारण एलेक्ट्रानिक उपकरणों का आकार अत्यन्त छोटा हो गया है, उनकी कार्य क्षमता बहुत अधिक हो गयी है एवं उनकी शक्ति की जरूरत बहुत कम हो गयी है।



 *५ फेब्रुवारी २००४*


*PSLV C - 4  या उपग्रहाला कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले.*


अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.




 *सत्येंद्रनाथ बोस*


*भारतीय शास्त्रज्ञ*


*स्मृतिदिन - ४ फेब्रुवारी १९७४*


सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ

बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.

सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळ्वून उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येंद्रनाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येंद्रनाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच, यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि व्हायोलीन सारखे एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत.

१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.

१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.

भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.

दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.





 *नील आर्मस्ट्राँग*


*चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव*


*जन्मदिन - ५ ऑगस्ट, १९३०*


नील आर्मस्ट्राँग (ऑगस्ट ५, इ.स. १९३० - ऑगस्ट २५, इ.स. २०१२) हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते




Rontgen



 

*स्मृतिदिन - १० फेब्रुवारी १९३०*

 *विल्हेल्म राँटजेन*


*X-RAY संशोधन*


*स्मृतिदिन - १० फेब्रुवारी १९३०*


क्ष-किरण

हे एक प्रकारचे विद्युतचंबकीय विकीरण असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटर पर्यंत असते. वारंवारिता ही ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्साहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनिल किरणांपेक्षा जास्त असते.

शोध

विल्यम राँटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालु होते. फक्त विल्यम राँटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे विस्तृत केली. विल्यम राँटजेनच्या आधी जोहॉन हित्रोफ, Ivan Pulyui, नोकोला टेस्ला, फरर्नंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम राँटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे निदर्शनास आले की काही किरणे न दिसता असतात व ते वस्तूंच्या आरपार जातात. त्यांचे नामकरण 'क्ष' केले गेले.


26 January 2023