*९ फेब्रुवारी १९८६*
*हँलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.*
*🔘हॅले धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. ९ फेब्रुवारी इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे
*🌠धूमकेतूचे आकारमान*
*🔘धूमकेतूच्या शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० कि.मी. असून त्याचे वस्तुमा
न १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.
*🌌धूमकेतूची शेपटी*
*🔘धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा