📙 *डॉक्टरांच्या गाड्या, रुग्णालये यांवर रेडक्रॉसची खूण का असते ?* 📙

हेन्री डय़ूनाँट या स्विस व्यापार्‍याने १९५९ मध्ये उत्तर इटलीतून प्रवास करताना साॅलफेरीनोचे युद्ध पाहिले. जखमी सैनिकांच्या मदतीसाठी त्याने स्वयंसेवक गोळा केले व मदतकार्य केले. नंतर सर्व युरोपभर फिरून त्याने युद्धातील जखमींना मदत करण्यासाठी निष्पक्ष अशी स्वयंसेवी संघटना अस्तित्वात यावी यासाठी प्रचार केला. यांच्या प्रयत्नांमुळे १८६४ साली 'रेडक्रॉस' ही अराजकीय, अशासकीय अशी मानवतावादी आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आली. सुरुवातीला युद्धातील जखमी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना मदत करणारी ही संघटना गेली काही दशकात नैसर्गिक आपत्ती, आरोग्य समस्या, रक्तदान अशा अनेक प्रकारच्या मदतकार्यात सहभागी होत आहे.

'लाल फुली' हे या संघटनेचे चिन्ह होय. रेडक्रॉसचे स्वयंसेवक, त्यांच्या गाड्या खूप याव्यात हा या चिन्हाचा उद्देश होता. त्यामुळे हे चिन्ह बाकी कोणी वापरत नसे. कालांतराने सैन्यदलांचे डॉक्टर व त्यांची वाहने इत्यादींसाठी हे चिन्ह वापरले जाऊ लागले. सध्या सर्व डॉक्टर्स त्यांच्या गाड्या व रुग्णालये यावर हे चिन्ह सर्रास वापरले जाताना दिसते. त्यामुळे असा वापर रूढ झाला आहे. एका विशिष्ट संघटनेचे चिन्ह असलेली ही 'लाल फुली' समाजात एवढी रुढ झाली की 'लाल फुली, म्हणजे 'वैद्यकीय सेवेची उपलब्धता' असा त्याचा अर्थ आपोआप ध्वनित होतो. त्यामुळेच डॉक्टरांच्या गाड्या, रुग्णालये इत्यादींवर रेड क्रॉसची खूण असे.

 रेडक्रॉसचे हे चिन्ह डॉक्टर व रुग्णालये यांनी वापरू नये असे सांगितले आहे. त्यामुळे आता अनेक डॉक्टर व रुग्णालयांवर लाल फुलीचा चिन्ह आढळून येत नाही त्या ऐवजी नवीन चिन्ह पहायला मिळते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

26 January 2023