*विल्हेल्म राँटजेन*
*X-RAY संशोधन*
*स्मृतिदिन - १० फेब्रुवारी १९३०*
क्ष-किरण
हे एक प्रकारचे विद्युतचंबकीय विकीरण असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटर पर्यंत असते. वारंवारिता ही ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्साहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनिल किरणांपेक्षा जास्त असते.
शोध
विल्यम राँटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालु होते. फक्त विल्यम राँटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे विस्तृत केली. विल्यम राँटजेनच्या आधी जोहॉन हित्रोफ, Ivan Pulyui, नोकोला टेस्ला, फरर्नंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम राँटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे निदर्शनास आले की काही किरणे न दिसता असतात व ते वस्तूंच्या आरपार जातात. त्यांचे नामकरण 'क्ष' केले गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा