This is Maharashtra state government school of department of social welfare and special assistant and specially for science
Teachers day celebration -2022
![]()
5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिन
अहवाल
अनु. जाती व नवबौध्द मुलींची
शासकीय निवासी शाळा, सरांडी
अनुसुचित जाती व नवबौद्ध
मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने
विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे- त्यात शिक्षक
प्रतिग्या वाचन, व्रुक्षारोपण, विद्यार्थी स्वयंशासन, सांस्क्रुतिक कार्यक्रमात
एकपात्री नाटक, नाटक, भाषण, गीत गायन अशे विविधांगी कार्यक्रम घेण्यात आले.
शिक्षक प्रतिज्ञा वाचन:-
शाळेत दिवसाची सुरुवात 5 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक प्रतिज्ञाने झाली. सर्व शिक्षकांनी प्रतिज्ञाने वाचन केले.
शाळेत
५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिनानिमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले.
शाळेतील मुख्याध्यापक श्री.आंबीलकर सर,शाळेच्या प्र.गृहपाल श्रीमती घरडे मॅडम व
सहाय्यक शिक्षक श्री. तुरक सर, श्री. शहारे सर, ढवळे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती सार्वे मॅडम, श्रीमती धांडे मॅडम तसेच
विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्ताने शाळेतील विद्यार्थीनींनी विविध भुमिका केल्या. त्यात शाळेतील कु. पेहर जनबंधू ही मुख्याध्यापक कु. सुहानी माटे ही ग्रुहपाल कु अक्षरा कडबे, कु सायना नंदागवळी, कु त्रुप्ती शेंडे, कु प्रियांशी मेश्राम, कु तेजस्वी शेंडे, कु खुशी उईके या विद्यार्थीनींनी शिक्षक पदाची भुमिका तर कु तन्नु कुंभारे ही शिपाई पदाची भुमिका निभावली.
डॉ. सर्वपल्ली
राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पुजन ज्या विद्यार्थीनींनी स्वयंशासन मध्ये
भाग घेतलेला होता त्या विद्यार्थीनींनी प्रतिमेचे पुजन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विषयी माहिती दिली.
शाळेतील मुख्याध्यापकाची भुमिका करणारी कु. पेहर जनबंधू ही अध्यक्ष स्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुहपालाची भुमिका सांभाळणा-या कु. सुहानी माटे हीने स्थान ग्रहण केले होते.
:: सांस्कृतिक
कार्यक्रम ::
वक्तृत्व
स्पर्धेचे आयोजन :-
वक्त्रुत्व स्पर्धेत कु. आचल वावरे, कु. पेहर जनबंधू, कु. लक्ष्मी कु-हाडे, कु. तनूश्री मेश्राम, कु.तन्नु कुंभारे, कु.त्रुप्ती
शेंडे, कु. तेजस्वी शेंडे, कु. अक्षरा कडबे, कु. प्रियांशी मेश्राम, कु. आचल कनोजे, कु. खुशी उईके, कु. सुहानी माटे या विद्यार्थीनींनी भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवनातील ठळक घडामोडीवर प्रकाश
टाकला.तसेच कु. आचल कनोजे हीने गीत गायन
केले व वर्ग 8 वी व 9वी च्या
विद्यार्थीनींनी सामुहिक गीत सादरिकरण केले.
नाट्य सादरिकरण-
अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,
सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे 5 सप्टेंबर निमित्ताने विद्यार्थीनींनी
महात्मा फ़ुले व क्रांती ज्योति सावित्रीबाई फ़ुले यांचेवर आधारित नाटिकेचे सादरिकरण
केले. नाटीकेत कु पेहर जनबंधू हीने महात्मा फ़ुले यांचे पात्र केले तर कु सायना
नंदागवळी या विद्यार्थीनींने सावित्रीबाई फ़ुले यांचे पात्र तर लक्ष्मी कु-हाडे, कु
रिया उके, कु त्रुप्ती शेंडे, कु अक्षरा कडबे, कु तनुश्री मेश्राम, कु खुशी उईके
या विद्यार्थीनींनी इतर पात्र केले.
एकपात्री नाटक सादरीकरण
शाळेतील
वर्ग 10 वीची विद्यार्थीनी कु तेजस्वी शेंडे या विद्यार्थीनीने “मी
सावित्रीबाई बोलते” ही एक
पात्री
नाटक सादर करतानाचे क्षणचित्र
प्रोत्साहनपर बक्षिस वितरण
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थीनींनी विविध कार्यक्रमात उत्सफ़ुर्तपणे सहभाग घेतला व कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडला, करिता शाळेचे मुख्याध्यापक व इतर सहाय्यक शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थीनींना प्रोत्साहन बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता
अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले व कार्यक्रमाचे समारोप कु. अक्षरा कडबे या विद्यार्थीनीने केले.
सामजिक न्याय दिन 2022 निमीत्त समाज कल्याण गोंदिया येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दिनांक 26 जून 2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त सामजिक न्याय भवन,समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे सामाजिक न्याय दिनाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते.
मा. जिल्हाधिकारी भाप्रसे श्रीमती नयना गुंडे यांच्या हस्ते मुलींची शासकीय निवासी शाळा,सरांडी येथील सत्र 2021-22 च्या 10वी च्या प्रथम प्रावीण्य प्राप्त कु. कल्याणी भालेराव, व्दितीय क्रमांक कु. आकांक्षा गौरे व तृतीय क्रमांक कु. प्रिया उके यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी, कर्मचारी वर्ग व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग सहभागी होते ... राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त सामाजिक न्याय दिन 26 जून 2022 रोजी समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे मा. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले व वृक्षारोपण केले...त्या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी कर्मचारी व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग सहभागी झाले...
दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस'
दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' निमित शालेय कर्मचारी यांनी विविध प्रकारचे योगासन करून
साजरा करण्यात आला.
अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी, त.तिरोडा जि. गोंदिया यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2022
आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोज गुरुवारला अनु. जातीव नवबाेध्द मुलींची शासकिय निवासी शाळा सरांडी,येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती,श्री.डी.जी.आंबिलकर मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. तुरक सर, कू प्रीति घरडे मँडम, श्री आशिष शहारे सर, श्री उमेश ढवळे सर, कू सविता सार्वे स्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वागत गित, भाषण, गीत, नृत्य करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील विदयार्थी तेजस्वी शेंडे हिने केले व आभार मानले.
How the process of digestion
https://5minutecrafts.site/learn-science/how-the-process-of-digestion-works-2173/?utm_source=tsp_pages&utm_medium=fb_organic&utm_campaign=fb_gr_5_minute_crafts
राष्ट्रीय विज्ञान दिवस 2022
# science day2022,
#National science day2022
*शासकिय मुलीं
ची निवासी शाळा सरांडी येथे*
*🙏🏻 राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न🙏🏻*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोज सोमवारला आमच्या शासकिय मुलींची निवासी शाळा सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे डॉ सी व्हि रामन यांची जयंती ला राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त विद्यार्थिनी ची रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.धारेन्द्र आंबिलकर, गृहपाल कु. प्रिती घरडे,यांच्या अध्यक्षतेमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील कर्मचारी सहाय्यक शिक्षक श्री. तुरक,शहारे,ढवळे सर, प्रयाेगशाळा सहाय्यक कु. सविता सार्वे उपस्थित होते.
-
*जॉन डीयर* *डीयर अँड कंपनीचे संस्थापक* *जन्म: ७ फेब्रुवारी १८०४* जॉन डीयर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८०४ रोजी झाला. ते अमेरिकन लोहार आणि निर...
-
📒 *काविळीमध्ये डोळे, लघवी पिवळी का दिसते?* 📒 *********************************** डोळे पिवळे झाले, लघवी पिवळी होऊ लागली, त्वचेला पिवळट रंग...
-
*९ फेब्रुवारी १९८६* *हँलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.* *🔘हॅले धूमकेतू या धूमकेतूचे ...


















































































































