अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी, त.तिरोडा जि. गोंदिया यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली







शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १७ जून २०२२ शुक्रवारला लागला असुन तिरोडा येथील अनुसूचित जाती मुलीची निवासी शासकीय शाळा सरांडी येथील शाळेमधून, मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण  २० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. २o पैकी २०  विद्यार्थि चांगली टक्केवारी घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले

असून एकूण निकालाची टक्केवारी श्रेणीत १००% तर प्रथम श्रेणीत कु.कल्याणी भालेराव ९२.६०% घेऊन जिल्ह्यातील तीनही शाळेतून प्रथम येवून घवघवीत यश संपादन केले आहे.तसेच  द्वितीय कू. आकांक्षा मदन कुमार गौरे  ८९.२०% तृतीय  कु प्रिया भोजाराम उके ८९% चतुर्थ कू. निश्चल शैलेश उके ८८.८०% शालेय उपक्रम व योग्य नियोजन व सराव परीक्षा यासाठी महत्वाचे असून शाळेमधून 100% विद्यार्थी पास झाले असून . इतर विद्यार्थी सुद्धा चांगले टक्केवारीने उत्तीर्ण झालेले आहे अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.घरडे मॅडम, श्री.शहारे सर,
श्री.ढवळे सर, कु. सार्वे मॅडम,व शाळेतील सर्वत्र शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

 चांगली टक्केवारी घेऊन परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे एकंदरीत विद्यार्थिनीचा यावर्षीही सुद्धा अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी शाळेचा निकाल 100% लावून आपली परंपरा कायम ठेवली आहे परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य सहित उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे  

उत्कृष्ट निकालाबाबत अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यावर तिरोडा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

26 January 2023