5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिन
अहवाल
अनु. जाती व नवबौध्द मुलींची
शासकीय निवासी शाळा, सरांडी
अनुसुचित जाती व नवबौद्ध
मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने
विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे- त्यात शिक्षक
प्रतिग्या वाचन, व्रुक्षारोपण, विद्यार्थी स्वयंशासन, सांस्क्रुतिक कार्यक्रमात
एकपात्री नाटक, नाटक, भाषण, गीत गायन अशे विविधांगी कार्यक्रम घेण्यात आले.
शिक्षक प्रतिज्ञा वाचन:-
शाळेत दिवसाची सुरुवात 5 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक प्रतिज्ञाने झाली. सर्व शिक्षकांनी प्रतिज्ञाने वाचन केले.
शाळेत
५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिनानिमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले.
शाळेतील मुख्याध्यापक श्री.आंबीलकर सर,शाळेच्या प्र.गृहपाल श्रीमती घरडे मॅडम व
सहाय्यक शिक्षक श्री. तुरक सर, श्री. शहारे सर, ढवळे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती सार्वे मॅडम, श्रीमती धांडे मॅडम तसेच
विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्ताने शाळेतील विद्यार्थीनींनी विविध भुमिका केल्या. त्यात शाळेतील कु. पेहर जनबंधू ही मुख्याध्यापक कु. सुहानी माटे ही ग्रुहपाल कु अक्षरा कडबे, कु सायना नंदागवळी, कु त्रुप्ती शेंडे, कु प्रियांशी मेश्राम, कु तेजस्वी शेंडे, कु खुशी उईके या विद्यार्थीनींनी शिक्षक पदाची भुमिका तर कु तन्नु कुंभारे ही शिपाई पदाची भुमिका निभावली.
डॉ. सर्वपल्ली
राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पुजन ज्या विद्यार्थीनींनी स्वयंशासन मध्ये
भाग घेतलेला होता त्या विद्यार्थीनींनी प्रतिमेचे पुजन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विषयी माहिती दिली.
शाळेतील मुख्याध्यापकाची भुमिका करणारी कु. पेहर जनबंधू ही अध्यक्ष स्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुहपालाची भुमिका सांभाळणा-या कु. सुहानी माटे हीने स्थान ग्रहण केले होते.
:: सांस्कृतिक
कार्यक्रम ::
वक्तृत्व
स्पर्धेचे आयोजन :-
वक्त्रुत्व स्पर्धेत कु. आचल वावरे, कु. पेहर जनबंधू, कु. लक्ष्मी कु-हाडे, कु. तनूश्री मेश्राम, कु.तन्नु कुंभारे, कु.त्रुप्ती
शेंडे, कु. तेजस्वी शेंडे, कु. अक्षरा कडबे, कु. प्रियांशी मेश्राम, कु. आचल कनोजे, कु. खुशी उईके, कु. सुहानी माटे या विद्यार्थीनींनी भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवनातील ठळक घडामोडीवर प्रकाश
टाकला.तसेच कु. आचल कनोजे हीने गीत गायन
केले व वर्ग 8 वी व 9वी च्या
विद्यार्थीनींनी सामुहिक गीत सादरिकरण केले.
नाट्य सादरिकरण-
अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,
सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे 5 सप्टेंबर निमित्ताने विद्यार्थीनींनी
महात्मा फ़ुले व क्रांती ज्योति सावित्रीबाई फ़ुले यांचेवर आधारित नाटिकेचे सादरिकरण
केले. नाटीकेत कु पेहर जनबंधू हीने महात्मा फ़ुले यांचे पात्र केले तर कु सायना
नंदागवळी या विद्यार्थीनींने सावित्रीबाई फ़ुले यांचे पात्र तर लक्ष्मी कु-हाडे, कु
रिया उके, कु त्रुप्ती शेंडे, कु अक्षरा कडबे, कु तनुश्री मेश्राम, कु खुशी उईके
या विद्यार्थीनींनी इतर पात्र केले.
एकपात्री नाटक सादरीकरण
शाळेतील
वर्ग 10 वीची विद्यार्थीनी कु तेजस्वी शेंडे या विद्यार्थीनीने “मी
सावित्रीबाई बोलते” ही एक
पात्री
नाटक सादर करतानाचे क्षणचित्र
प्रोत्साहनपर बक्षिस वितरण
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थीनींनी विविध कार्यक्रमात उत्सफ़ुर्तपणे सहभाग घेतला व कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडला, करिता शाळेचे मुख्याध्यापक व इतर सहाय्यक शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थीनींना प्रोत्साहन बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता
अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले व कार्यक्रमाचे समारोप कु. अक्षरा कडबे या विद्यार्थीनीने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा