सामजिक न्याय दिन 2022 निमीत्त समाज कल्याण गोंदिया येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दिनांक 26 जून 2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त  सामजिक न्याय भवन,समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे  सामाजिक न्याय दिनाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व वृक्षारोपण  आयोजित करण्यात आले होते.
मा. जिल्हाधिकारी भाप्रसे श्रीमती नयना गुंडे यांच्या हस्ते मुलींची शासकीय निवासी शाळा,सरांडी  येथील सत्र 2021-22 च्या 10वी च्या प्रथम प्रावीण्य प्राप्त कु. कल्याणी भालेराव, व्दितीय क्रमांक कु. आकांक्षा गौरे व तृतीय क्रमांक कु. प्रिया उके यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी, कर्मचारी वर्ग व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग  सहभागी होते ... राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त सामाजिक न्याय दिन 26 जून 2022 रोजी  समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे मा. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले व वृक्षारोपण केले...त्या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी कर्मचारी व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग  सहभागी झाले...



दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस'

 दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' निमित शालेय कर्मचारी यांनी विविध प्रकारचे योगासन करून 

















साजरा करण्यात आला.

सदर उपक्रमात अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शा ळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.पी एम घरडे मॅडम, श्री.ए एम शहारे सर,
श्री.यु एन ढवळे सर, कु. एस व्ही सार्वे मॅडम, की धांडे मॅडम बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी उत्स्फर्तपणे उपस्थिती दर्शविली.

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी, त.तिरोडा जि. गोंदिया यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली







शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १७ जून २०२२ शुक्रवारला लागला असुन तिरोडा येथील अनुसूचित जाती मुलीची निवासी शासकीय शाळा सरांडी येथील शाळेमधून, मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण  २० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. २o पैकी २०  विद्यार्थि चांगली टक्केवारी घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले

असून एकूण निकालाची टक्केवारी श्रेणीत १००% तर प्रथम श्रेणीत कु.कल्याणी भालेराव ९२.६०% घेऊन जिल्ह्यातील तीनही शाळेतून प्रथम येवून घवघवीत यश संपादन केले आहे.तसेच  द्वितीय कू. आकांक्षा मदन कुमार गौरे  ८९.२०% तृतीय  कु प्रिया भोजाराम उके ८९% चतुर्थ कू. निश्चल शैलेश उके ८८.८०% शालेय उपक्रम व योग्य नियोजन व सराव परीक्षा यासाठी महत्वाचे असून शाळेमधून 100% विद्यार्थी पास झाले असून . इतर विद्यार्थी सुद्धा चांगले टक्केवारीने उत्तीर्ण झालेले आहे अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.घरडे मॅडम, श्री.शहारे सर,
श्री.ढवळे सर, कु. सार्वे मॅडम,व शाळेतील सर्वत्र शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

 चांगली टक्केवारी घेऊन परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे एकंदरीत विद्यार्थिनीचा यावर्षीही सुद्धा अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी शाळेचा निकाल 100% लावून आपली परंपरा कायम ठेवली आहे परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य सहित उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे  

उत्कृष्ट निकालाबाबत अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यावर तिरोडा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे



 *🌸मोफत प्रवेश सूचना🌸*








*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदियाअंतर्गत*

🌸 *अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि गोंदिया (महाराष्ट्र)* 🌸

शैक्षणिक सत्र 2022-23 करीता इयत्ता 6 ली ते 10 वी साठी (सेमी इंग्रजी माध्यम) प्रवेश घेणेबाबत.

ही शाळा अनु जाती प्रवर्गातील शेतमजूर, भूमीहीन कामगार, लघु व्यावसायिक तसेच शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत्या त्यांच्या पाल्यांना मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने सन 2013-14 पासून सुरू करण्यात आली आहे.  

📕 *शाळेची वैशिष्टे :*
1. सुसज्ज इमारत, हवेशीर वर्गखोल्या
2. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, सर्व शालेय साहित्य, निवास व भोजन व्यवस्था
3. शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके,  स्टेशनरी इ. सुविधा मोफत 
4 प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक
5. सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन
6. डिजिटल वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, वाचन कक्ष, ग्रंथालय, इ- ग्रंथालय, क्रिडा सुविधा इ. उपलब्ध 
7. गुणवत्ता संवर्धनासाठी रात्र अभ्यासिकेची स्वतंत्र व्यवस्था
8. नियमित वैद्यकीय तपासणी व वैयक्तिक मार्गदर्शन 
9. स्पर्धा परीक्षा आणि स्काॅलरशीप परीक्षेची तयारी 

📕 *प्रवेश आरक्षण*

(इयत्ता 6 वी साठी पूर्णतः नवीन प्रवेश: 40 विद्यार्थीनी आणि इतर वर्गात रिक्त संख्येनुसार)
* SC - 80% (प्रत्येक वर्गात एकूण 32 जागा)
* ST - 10% (प्रत्येक वर्गात एकूण 4 जागा)
* VJ/NT - 5% (प्रत्येक वर्गात एकूण 2 जागा)
* SBC - 3% (प्रत्येक वर्गात एकूण 1 जागा)
* HANDICAP - 2% (प्रत्येक वर्गात एकूण 1 जागा)

📕 *प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे*
* शाळा सोडल्याचा दाखला 
* गुणपत्रिका (मागील वर्षाची)
* विद्यार्थीनीचे जात प्रमाणपत्र
* चार फोटो (नुकतेच काढलेले)
* आधारकाॅर्ड झेराॅक्स
* आधार लिंक केलेली बँक पासबुकची झेराॅक्स 
* उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
* रहिवासी दाखला 
* संचयी नोंदपत्रक
* वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र
* आईवडिल/ पालक यांचे आधार कार्ड व फोटो 

📕 *प्रवेशकरिता संपर्क*
श्री. डी. जी. आंबिलकर(मुख्याध्यापक)
 83909 14367
श्री हिदायत गौस मोहम्मद तुरक (स. शि.) 
8228 70337
श्रीमती प्रिती महादेव घरडे (स. शि.)
97655 70326
श्री आशिषकुमार मारोती शहारे (स. शि.)
89995 10785
श्री उमेश निलकंठराव ढवळे (स. शि.)
98227 39150
श्रीमती कविता शामराव पडोळे (ग्र॔थपाल)
 95796 50805
श्रीमती सविता विजय सार्वे (प्रयोगशाळा सहा.)
7875885551
श्री निलेश दुधराम गाढवे (शिपाई)
89835 07574


(टीप : सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत)

*कृपया ही माहिती गरजू व लाभार्थी मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावी ही विनंती* 🙏

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2022










 आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोज गुरुवारला अनु. जातीव नवबाेध्द मुलींची शासकिय निवासी शाळा सरांडी,येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती,श्री.डी.जी.आंबिलकर मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. तुरक सर, कू प्रीति घरडे मँडम, श्री आशिष शहारे सर, श्री उमेश ढवळे सर, कू सविता सार्वे स्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वागत गित, भाषण, गीत, नृत्य करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील विदयार्थी तेजस्वी शेंडे हिने केले व आभार मानले.

26 January 2023