Teachers day celebration -2022


5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिन अहवाल

अनु. जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी

            अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे 5 सप्टेंबर ॉ. सर्वपल्ली राधाकष्णन यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे- त्यात शिक्षक प्रतिग्या वाचन, व्रुक्षारोपण, विद्यार्थी स्वयंशासन, सांस्क्रुतिक कार्यक्रमात एकपात्री नाटक, नाटक, भाषण, गीत गायन अशे विविधांगी कार्यक्रम घेण्यात आले.

शिक्षक प्रतिज्ञा वाचन:-

शाळेत दिवसाची सुरुवात 5 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक प्रतिज्ञाने झाली. सर्व शिक्षकांनी प्रतिज्ञाने वाचन केले. 

            शाळेत ५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिनानिमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. शाळेतील मुख्याध्यापक श्री.आंबीलकर सर,शाळेच्या प्र.गृहपाल श्रीमती घरडे मॅडम व सहाय्यक शिक्षक श्री. तुरक सर, श्री. शहारे सर, ढवळे सर,  शिक्षकेत्तर कर्मचारी  श्रीमती सार्वे मॅडम, श्रीमती धांडे मॅडम तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

                      शिक्षक दिनानिमित्ताने शाळेतील विद्यार्थीनींनी विविध भुमिका केल्या. त्यात शाळेतील कु. पेहर जनबंधू ही मुख्याध्यापक कु. सुहानी माटे ही ग्रुहपाल कु अक्षरा कडबे, कु सायना नंदागवळी, कु त्रुप्ती शेंडे, कु प्रियांशी मेश्राम, कु तेजस्वी शेंडे, कु खुशी उईके या विद्यार्थीनींनी शिक्षक पदाची भुमिका तर कु तन्नु कुंभारे ही शिपाई पदाची भुमिका निभावली.

ॉ. सर्वपल्ली राधाकष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन

            ॉ. सर्वपल्ली राधाकष्णन यांचे प्रतिमेचे पुजन ज्या विद्यार्थीनींनी स्वयंशासन मध्ये भाग घेतलेला होता त्या विद्यार्थीनींनी प्रतिमेचे पुजन करून ॉ. सर्वपल्ली राधाकष्णन यांचे विषयी माहिती दिली.

शाळेतील मुख्याध्यापकाची भुमिका करणारी कु. पेहर जनबंधू ही अध्यक्ष स्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुहपालाची भुमिका सांभाळणा-या कु. सुहानी माटे हीने स्थान ग्रहण केले होते.

:: सांस्कृतिक कार्यक्रम ::

क्तृत्व स्पर्धेचे आयोजन :-

वक्त्रुत्व स्पर्धेत कु. आचल वावरे, कु. पेहर जनबंधू, कु. लक्ष्मी कु-हाडे, कु. तनूश्री मेश्राम, कु.तन्नु कुंभारे, कु.त्रुप्ती शेंडे, कु. तेजस्वी शेंडे, कु. अक्षरा कडबे, कु. प्रियांशी मेश्राम, कु. आचल कनोजे, कु. खुशी उईके, कु. सुहानी माटे या विद्यार्थीनींनी भाषणातून ड. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवनातील ठळक घडामोडीवर प्रकाश टाकला.तसेच कु. आचल कनोजे हीने गीत गायन केल व वर्ग 8 वी व 9वी च्या विद्यार्थीनींनी सामुहिक गीत सादरिकरण केले.

नाट्य सादरिकरण-

अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे 5 सप्टेंबर निमित्ताने विद्यार्थीनींनी महात्मा फ़ुले व क्रांती ज्योति सावित्रीबाई फ़ुले यांचेवर आधारित नाटिकेचे सादरिकरण केले. नाटीकेत कु पेहर जनबंधू हीने महात्मा फ़ुले यांचे पात्र केले तर कु सायना नंदागवळी या विद्यार्थीनींने सावित्रीबाई फ़ुले यांचे पात्र तर लक्ष्मी कु-हाडे, कु रिया उके, कु त्रुप्ती शेंडे, कु अक्षरा कडबे, कु तनुश्री मेश्राम, कु खुशी उईके या विद्यार्थीनींनी इतर पात्र केले.

एकपात्री नाटक सादरीकरण

शाळेतील वर्ग 10 वीची विद्यार्थीनी कु तेजस्वी शेंडे या विद्यार्थीनीने ‌मी सावित्रीबाई बोलतेही एक

पात्री नाटक सादर करतानाचे क्षणचित्र  

           प्रोत्साहनपर बक्षिस वितरण

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थीनींनी विविध कार्यक्रमात उत्सफ़ुर्तपणे सहभाग घेतला व कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडला, करिता शाळेचे मुख्याध्यापक व इतर सहाय्यक शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थीनींन प्रोत्साहन बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाची सांगता

            अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले व कार्यक्रमाचे समारोप कु. अक्षरा कडबे या विद्यार्थीनीने केले.                                                                                     


















 









सामजिक न्याय दिन 2022 निमीत्त समाज कल्याण गोंदिया येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दिनांक 26 जून 2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त  सामजिक न्याय भवन,समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे  सामाजिक न्याय दिनाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व वृक्षारोपण  आयोजित करण्यात आले होते.
मा. जिल्हाधिकारी भाप्रसे श्रीमती नयना गुंडे यांच्या हस्ते मुलींची शासकीय निवासी शाळा,सरांडी  येथील सत्र 2021-22 च्या 10वी च्या प्रथम प्रावीण्य प्राप्त कु. कल्याणी भालेराव, व्दितीय क्रमांक कु. आकांक्षा गौरे व तृतीय क्रमांक कु. प्रिया उके यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी, कर्मचारी वर्ग व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग  सहभागी होते ... राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त सामाजिक न्याय दिन 26 जून 2022 रोजी  समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे मा. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले व वृक्षारोपण केले...त्या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी कर्मचारी व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग  सहभागी झाले...



दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस'

 दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' निमित शालेय कर्मचारी यांनी विविध प्रकारचे योगासन करून 

















साजरा करण्यात आला.

सदर उपक्रमात अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शा ळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.पी एम घरडे मॅडम, श्री.ए एम शहारे सर,
श्री.यु एन ढवळे सर, कु. एस व्ही सार्वे मॅडम, की धांडे मॅडम बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी उत्स्फर्तपणे उपस्थिती दर्शविली.

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी, त.तिरोडा जि. गोंदिया यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली







शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १७ जून २०२२ शुक्रवारला लागला असुन तिरोडा येथील अनुसूचित जाती मुलीची निवासी शासकीय शाळा सरांडी येथील शाळेमधून, मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण  २० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. २o पैकी २०  विद्यार्थि चांगली टक्केवारी घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले

असून एकूण निकालाची टक्केवारी श्रेणीत १००% तर प्रथम श्रेणीत कु.कल्याणी भालेराव ९२.६०% घेऊन जिल्ह्यातील तीनही शाळेतून प्रथम येवून घवघवीत यश संपादन केले आहे.तसेच  द्वितीय कू. आकांक्षा मदन कुमार गौरे  ८९.२०% तृतीय  कु प्रिया भोजाराम उके ८९% चतुर्थ कू. निश्चल शैलेश उके ८८.८०% शालेय उपक्रम व योग्य नियोजन व सराव परीक्षा यासाठी महत्वाचे असून शाळेमधून 100% विद्यार्थी पास झाले असून . इतर विद्यार्थी सुद्धा चांगले टक्केवारीने उत्तीर्ण झालेले आहे अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.घरडे मॅडम, श्री.शहारे सर,
श्री.ढवळे सर, कु. सार्वे मॅडम,व शाळेतील सर्वत्र शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

 चांगली टक्केवारी घेऊन परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे एकंदरीत विद्यार्थिनीचा यावर्षीही सुद्धा अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी शाळेचा निकाल 100% लावून आपली परंपरा कायम ठेवली आहे परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य सहित उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे  

उत्कृष्ट निकालाबाबत अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यावर तिरोडा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे



 *🌸मोफत प्रवेश सूचना🌸*








*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदियाअंतर्गत*

🌸 *अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा, जि गोंदिया (महाराष्ट्र)* 🌸

शैक्षणिक सत्र 2022-23 करीता इयत्ता 6 ली ते 10 वी साठी (सेमी इंग्रजी माध्यम) प्रवेश घेणेबाबत.

ही शाळा अनु जाती प्रवर्गातील शेतमजूर, भूमीहीन कामगार, लघु व्यावसायिक तसेच शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत्या त्यांच्या पाल्यांना मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने सन 2013-14 पासून सुरू करण्यात आली आहे.  

📕 *शाळेची वैशिष्टे :*
1. सुसज्ज इमारत, हवेशीर वर्गखोल्या
2. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, सर्व शालेय साहित्य, निवास व भोजन व्यवस्था
3. शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके,  स्टेशनरी इ. सुविधा मोफत 
4 प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक
5. सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन
6. डिजिटल वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, वाचन कक्ष, ग्रंथालय, इ- ग्रंथालय, क्रिडा सुविधा इ. उपलब्ध 
7. गुणवत्ता संवर्धनासाठी रात्र अभ्यासिकेची स्वतंत्र व्यवस्था
8. नियमित वैद्यकीय तपासणी व वैयक्तिक मार्गदर्शन 
9. स्पर्धा परीक्षा आणि स्काॅलरशीप परीक्षेची तयारी 

📕 *प्रवेश आरक्षण*

(इयत्ता 6 वी साठी पूर्णतः नवीन प्रवेश: 40 विद्यार्थीनी आणि इतर वर्गात रिक्त संख्येनुसार)
* SC - 80% (प्रत्येक वर्गात एकूण 32 जागा)
* ST - 10% (प्रत्येक वर्गात एकूण 4 जागा)
* VJ/NT - 5% (प्रत्येक वर्गात एकूण 2 जागा)
* SBC - 3% (प्रत्येक वर्गात एकूण 1 जागा)
* HANDICAP - 2% (प्रत्येक वर्गात एकूण 1 जागा)

📕 *प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे*
* शाळा सोडल्याचा दाखला 
* गुणपत्रिका (मागील वर्षाची)
* विद्यार्थीनीचे जात प्रमाणपत्र
* चार फोटो (नुकतेच काढलेले)
* आधारकाॅर्ड झेराॅक्स
* आधार लिंक केलेली बँक पासबुकची झेराॅक्स 
* उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
* रहिवासी दाखला 
* संचयी नोंदपत्रक
* वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र
* आईवडिल/ पालक यांचे आधार कार्ड व फोटो 

📕 *प्रवेशकरिता संपर्क*
श्री. डी. जी. आंबिलकर(मुख्याध्यापक)
 83909 14367
श्री हिदायत गौस मोहम्मद तुरक (स. शि.) 
8228 70337
श्रीमती प्रिती महादेव घरडे (स. शि.)
97655 70326
श्री आशिषकुमार मारोती शहारे (स. शि.)
89995 10785
श्री उमेश निलकंठराव ढवळे (स. शि.)
98227 39150
श्रीमती कविता शामराव पडोळे (ग्र॔थपाल)
 95796 50805
श्रीमती सविता विजय सार्वे (प्रयोगशाळा सहा.)
7875885551
श्री निलेश दुधराम गाढवे (शिपाई)
89835 07574


(टीप : सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत)

*कृपया ही माहिती गरजू व लाभार्थी मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावी ही विनंती* 🙏

26 January 2023