सामजिक न्याय दिन 2022 निमीत्त समाज कल्याण गोंदिया येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दिनांक 26 जून 2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त  सामजिक न्याय भवन,समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे  सामाजिक न्याय दिनाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व वृक्षारोपण  आयोजित करण्यात आले होते.
मा. जिल्हाधिकारी भाप्रसे श्रीमती नयना गुंडे यांच्या हस्ते मुलींची शासकीय निवासी शाळा,सरांडी  येथील सत्र 2021-22 च्या 10वी च्या प्रथम प्रावीण्य प्राप्त कु. कल्याणी भालेराव, व्दितीय क्रमांक कु. आकांक्षा गौरे व तृतीय क्रमांक कु. प्रिया उके यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी, कर्मचारी वर्ग व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग  सहभागी होते ... राजर्षी शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त सामाजिक न्याय दिन 26 जून 2022 रोजी  समाज कल्याण गोंदिया येथे मा.सहा.आयुक्त श्री.वानखेडे साहेब तर्फे मा. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले व वृक्षारोपण केले...त्या वेळी सर्व निवासी शाळा विद्यार्थी कर्मचारी व समाज कल्याण विभाग कर्मचारी वर्ग  सहभागी झाले...



दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस'

 दिनांक 21जून 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' निमित शालेय कर्मचारी यांनी विविध प्रकारचे योगासन करून 

















साजरा करण्यात आला.

सदर उपक्रमात अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शा ळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.पी एम घरडे मॅडम, श्री.ए एम शहारे सर,
श्री.यु एन ढवळे सर, कु. एस व्ही सार्वे मॅडम, की धांडे मॅडम बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी उत्स्फर्तपणे उपस्थिती दर्शविली.

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी, त.तिरोडा जि. गोंदिया यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली







शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १७ जून २०२२ शुक्रवारला लागला असुन तिरोडा येथील अनुसूचित जाती मुलीची निवासी शासकीय शाळा सरांडी येथील शाळेमधून, मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण  २० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. २o पैकी २०  विद्यार्थि चांगली टक्केवारी घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले

असून एकूण निकालाची टक्केवारी श्रेणीत १००% तर प्रथम श्रेणीत कु.कल्याणी भालेराव ९२.६०% घेऊन जिल्ह्यातील तीनही शाळेतून प्रथम येवून घवघवीत यश संपादन केले आहे.तसेच  द्वितीय कू. आकांक्षा मदन कुमार गौरे  ८९.२०% तृतीय  कु प्रिया भोजाराम उके ८९% चतुर्थ कू. निश्चल शैलेश उके ८८.८०% शालेय उपक्रम व योग्य नियोजन व सराव परीक्षा यासाठी महत्वाचे असून शाळेमधून 100% विद्यार्थी पास झाले असून . इतर विद्यार्थी सुद्धा चांगले टक्केवारीने उत्तीर्ण झालेले आहे अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री डी जी आंबिलकर, शिक्षक श्री तूरक सर, कु.घरडे मॅडम, श्री.शहारे सर,
श्री.ढवळे सर, कु. सार्वे मॅडम,व शाळेतील सर्वत्र शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

 चांगली टक्केवारी घेऊन परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे एकंदरीत विद्यार्थिनीचा यावर्षीही सुद्धा अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी शाळेचा निकाल 100% लावून आपली परंपरा कायम ठेवली आहे परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य सहित उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे  

उत्कृष्ट निकालाबाबत अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यावर तिरोडा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

26 January 2023